जागा वाटपात अमित शाह यांची मध्यस्थी : शिंदे, दादांना दिला हा सल्ला

जागा वाटपात अमित शाह यांची मध्यस्थी : शिंदे, दादांना दिला हा सल्ला

-अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

प्रतिनिधी
मुंबई : गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठक झाली असून या बैठकीत जागावाटपाचा गुंता सोडवल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. महाराष्ट्रातील जागावाटपाच्या वादावर अमित शहा यांनी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. केंद्रीय मंत्री अमित शाह जागावाटपाबाबत आजही बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे, आजच्या बैठकीनंतर भाजपाच्या उमेदवारांची दुसरी यादी समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा उमेदवारांबाबत आज ६ मार्च रोजी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यादरम्यान पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारच्या उर्वरित जागांसाठी उद्या आणि परवा असे दोन दिवस चर्चा होणार आहे. या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहू शकतात. कोअर कमिटीच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी नावांवर विचारमंथन होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गजांना बाजूला करण्यात आले. आता दुसऱ्या यादीबाबतही चर्चा रंगली आहे. दुसऱ्या यादीत पक्ष मोठ्या प्रमाणात तिकीट कापू शकतो, असे मानले जात आहे.