आजपासून तीन दिवस सुप्रिया सुळे विदर्भ दौऱ्यावर, इथे देणार भेटी

आजपासून तीन दिवस सुप्रिया सुळे विदर्भ दौऱ्यावर, इथे देणार भेटी

प्रतिनिधी
नागपूर : विदर्भातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना एक नवीन उर्जा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांचा दौरा करणार असून या दरम्यान, त्या विविध ठिकाणी भेट
देणार व काही मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत.

सोबतच तिन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत.
१ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर असा तीन दिवसांचा त्यांचा हा विदर्भ दौरा राहणार असून त्यांच्यासोबत पक्षाच्या
महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे प्रदेश पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. रविवारी त्यांचे नागपूरपू येथे आगमन होणार असून दुपारी १२.३० वाजता दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. यानंतर स्वागत लॉन, सिव्हील लाइन येथे दुपारी २ वाजता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक
घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. स्वागत लॉन येथेच ६ वाजता पत्रकार परिषद घेवून नंतर शहरातील विविध समाविचार जेष्ठ विचावंतासोबत रविभवन येथे बैठक घेउन चर्चा करणार आहेत.