कारण काय ? सना मलिक भेटणार पवारांना
-मलिक यांची पुढची राजकीय भूमिका ठरणार
प्रतिनिधी
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक हे नुकतेच तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यानंतर नवाब मलिक यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच नवाब मलिक यांची कन्या सना मलिक सध्या मंत्रालयात दाखल झाल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांनी वेळ मागितली आहे.
नवाब मलिक तुरुंगात असताना राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर शरद पवार यांना मानणारे नेते त्यांच्यासोबत राहिले. अशात नवाब मलिक यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच सना मलिक यांनी अजित पवारांच्या भेटीसाठी वेळ मागणं हा चर्चेचा विषय बनला आहे.


