या अभिनेत्रीने थेट विचारले; राहुल गांधींचं लग्न का करत नाही

या अभिनेत्रीने थेट विचारले; राहुल गांधींचं लग्न का करत नाही
-अनेकांच्या उंचावल्या भुवया

प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे लग्न हा राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य माणसाचाही चर्चेचा विषय असतो. काही दिवसांपूर्वी त्यांच्या भेटीला आलेल्या काही महिलांनी राहुल यांच्या आई आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना, तुम्ही राहुल गांधींचं लग्न का करत नाही, असा प्रश्नच विचारला होता. त्यानंतर आता एका अभिनेत्रीने राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तिने त्यासाठी एक अटही घातली आहे.

बोल्डनेस आणि बोल्ड फोटोशूटसाठी प्रसिद्ध असलेली शर्लिन चोप्राने राहुल गांधींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शर्लिन लाइमलाइटमध्ये राहण्याची एकही संधी सोडत नाही. तिच्या वक्तव्यांमुळेही ती अनेकदा ट्रोल होत असते. अशातच तिने थेट राहुल गांधींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शर्लिन राहुल गांधीसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहत आहे. शर्लिनने राहुल गांधींसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना तिने ही इच्छा व्यक्त केली आहे. ‘तुला राहुल गांधींसोबत लग्न करायला आवडेल का?’ उत्तरात ती म्हणाली, ‘हो, का नाही.’ यासोबत शर्लिनने एक अटही ठेवली. लग्नानंतर आपण आडनाव बदलणार नाही, असं तिने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या शर्लिन चांगलीच चर्चेत आली आहे.

राहुल गांधींनी शर्लिन चोप्राच्या या अटी मान्य केल्या तर ती त्यांच्याशी लग्न करण्यास तयार आहेत. शर्लिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर यूजर्सच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. शर्लिनच्या या व्हिडिओवर लोक कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, शर्लिनने राखी सावंतसारखी नशा केली आहे.