अदानींची संपत्ती जप्त करावी, यासाठी काँग्रेसचे नागपुरात आंदोलन
– आमदार विकास ठाकरे यांनी केले नेतृत्व
– औरंगाबाद येथेही पडसाद
प्रतिनिधी
नागपूर/औरंगाबाद : औरंगाबाद तसेच नागपूरमध्ये काँग्रेसने एसबीआय बँकेसमोर जोरदार आंदोलन केले आहे. नागपुरात आमदार ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
अदानींची संपत्ती जप्त करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अदानी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.खाऊंगा नखाने दूंगा देश सारा बेच दूंगा, अदानीचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, अदानी हटाव देश बचाव हम दो हमारे हमारे दो देश को बेच दो, यासह विविध घोषणांनी एसबीआय बँक परिसर दणाणून गेला काँग्रेसच्या वतीने विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे.
औरंगाबाद: एसबीआयच्या मुख्यालयासमोर काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कल्याण काळे म्हणाले की एसबीआय आणि एलआयसी बँकेत गरिबांचा पैसा आहे. त्यामुळे या बँका आणि एलआयसी बुडाल्यास भारताची परिस्थिती श्रीलंके सारखी होईल.त्यामुळे आदानकडून घेतलेली कर्ज एसबीआय आणि एलआयसी यांनी संपत्ती जप्त करून वसूल करावेत. याबाबत आम्ही बँकेच्या मॅनेजर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
नागपूर: रेल्वे स्टेशन मार्गावरील एसबीआय कार्यालयासमोरील आंदोलनाचे नेतृत्व आमदार विकास ठाकरे यांनी केले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तीनशेवर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गुड्डू नेताम, युगुल विधवात, रमेश घाटोळे, सुनील जाधव, निमलेश वर्मा, सचिन तिवारी, फरदीन खान, आनंद तिवारी इतरांची उपस्थिती होती.


