राज्य सरकार व्हेंटिलेटरवर; राज्यपालही लवकरच जाणार

राज्य सरकार व्हेंटिलेटरवर; राज्यपालही लवकरच जाणार
-शिंदे सरकारवर टीका
प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून दोन गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पूर्ण पाहणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

राजकारण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. 2024 च्या आधी परिवर्तन होणार. तर डॅमेज कंट्रोलसाठी आधी डॅमेज व्हावे लागते. काही लोक सोडून गेली तर आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. पुढे ते म्हणाले की, शिवसेना एकच आहे. एकच राहील. गट तट हे तात्पुरते आहेत. बाळासाहेबांनी शिवसेना नावाचा वटवृक्षाचे बीज रोवले. त्या शिवसेनेचे नेतृत्व हे उद्धव ठाकरे करत आहे. त्यांना संपुर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे. शिवसेना महावृक्ष आहे. महावृक्षाचा पालापाचोळा पडतो. ते लोक उचलून नेतो. पालापाचोळा जाळून त्यांचा वापर शेकोटीसाठी केला जातो.

संजय राऊत म्हणाले की, अधिवेशनात अनेक प्रकरणे समोर आली. सहा मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आरोप झाले. पुरावे मिळूनही एकावरही कारवाई झाली नाही. पण टीका केवळ विरोधी पक्षावर झाली. आंदोलन करणारी पिढी बदललली पण आंदोलन सुरूच राहतील. शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊतने घेतली आहे. आत्ताच्या राजकारणातला संजय राऊत जोकर आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. तसेच तू जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार आहे म्हणत राऊतांचे चॅलेंज स्वीकारले आहे. संजय राऊत यांना आपण पुन्हा जेलवारी घडवणार, असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. तर नारायण राणेंनी केलेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी देखील तिखट शब्दांमध्ये ‘माझ्या नादाला लागू नका. राजवस्त्र उतरवून या,’, असे म्हणत पलटवार केला होता. आज पुन्हा एकदा नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे.