या राज्यातील निवडणुकात काँग्रेस पक्षाची या प्रादेशिक पक्षासोबत होणार युती!

या राज्यातील निवडणुकात काँग्रेस पक्षाची या प्रादेशिक पक्षासोबत होणार युती!

-काय आहे राजकीय समीकरणे

उत्तर प्रदेश : येथील विधानसभा निवडणूक इंडिया आघाडी म्हणून एकत्र लढू, असे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांनी अगोदरच जाहीर केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अनेकवेळा याचा उच्चार केला आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाकडूही अशीच भूमिका मांडली गेली आहे. पण, दोन्ही पक्षांनी सर्वच मतदारसंघांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचीही तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे एकत्रच लढणार की ऐनवेळी स्वबळावर उतरणार, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

काँग्रेसमध्ये घाईगडबडीचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीशी आघाडी करूनच निवडणूक लढवायची आहे, पण त्यांना लवकरात लवकर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करायचा आहे. पक्षाला कोणत्या जागांवर निवडणूक लढवायची आहे, त्या जागांची राजकीय समीकरणे काय आहेत आणि कोणाला उमेदवारी देऊन जिंकून आणता येईल, यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत.

दुसरीकडे, समाजवादी पार्टी जागावाटपाबाबत कोणतीही घाई दाखवत नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये स्वतःची तयारी पूर्ण झाल्यावर जागावाटपावर चर्चा करण्याची अखिलेश यादव यांच्या पार्टीची इच्छा आहे. मात्र, काँग्रेसमध्ये अशी भावना आहे की, आघाडीत जागा निश्चित करायला उशीर झाला, तर त्यांची बार्गेनिंग पॉवर संपेल आणि मग अखिलेश यादव यांच्या म्हणण्यानुसारच आघाडी करावी लागेल.

काँग्रेसचे नेते आणि पक्षाचा मुस्लिम चेहरा असलेले खासदार इम्रान मसूद यांना कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत आघाडीतील जागा आणि मतदारसंघांची नावे निश्चित करायची आहेत. इम्रान मसूद यांनी म्हटले आहे की, आघाडीच्या घोषणेला उशीर झाला, तर काँग्रेस आपली मतदारंसंघातील सरशी गमावून बसेल. आघाडी करायचीच असेल, तर ती त्वरित अंतिम केली पाहिजे. जागावाटपाला होणाऱ्या उशिरामुळे जमिनीवर नुकसान होत आहे, याचा कोणताही फायदा होणार नाही.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत, परंतु एकत्र आल्याशिवाय निवडणुकीत निभाव लागणे कठीण आहे, याची कल्पना दोघांनाही आहे. प्रत्येक पक्षाला आपली बार्गेनिंग पॉवर मजबूत ठेवूनच चर्चेच्या टेबलावर बसायचे आहे.

इम्रान मसूद यांनी असा दावा केला आहे की, काँग्रेस पक्षाने दीडशंपेक्षा जास्त जागांची यादी समाजवादी पक्षाकडे सोपवली आहे, परंतु समाजवादी पक्षाकडून आघाडीच्या चर्चेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अखिलेश यादव यांच्याकडून एकच गोष्ट सातत्याने सांगितली जात आहे की, त्यांच्यासाठी जागावाटपात जागांच्या संख्येला महत्त्व नसून, विजयाची हमी महत्त्वाची आहे. जो जिथे जिंकू शकतो, तो तिथे निवडणूक लढवेल.

समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आतापर्यंत अनधिकृतपणे आघाडीबाबत काही हालचाली सुरू झाल्या असल्या, तरी अधिकृतपणे कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. समाजवादी पक्षाला ही चर्चा निवडणुकीच्या घोषणेपर्यंत ताणायची आहे, तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आघाडीसह जागावाटपाची सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू इच्छितात.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत, परंतु एकत्र आल्याशिवाय निवडणुकीत निभाव लागणे कठीण आहे, याची कल्पना दोघांनाही आहे. प्रत्येक पक्षाला आपली बार्गेनिंग पॉवर मजबूत ठेवूनच चर्चेच्या टेबलावर बसायचे आहे.