राजकीय घडामोडीना वेग; अमित शाह महाराष्ट्रातील या शहरात रात्री दाखल
-होणार महत्वाचे कार्यक्रम
प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपाकडून अमित शाह यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, आज रात्री अमित शाह हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाल्यानंतर अमित शाह यांचे स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे यांनी केले. यावेळी राज्यमंत्री अतुल सावेही उपस्थित होते.
आज रात्री अमित शाह छत्रपती छत्रपती संभाजीनगरमध्येच मुक्कामी असणार आहेत. उद्या सकाळी अमित शाह अकोला आणि जळगावमधल्या सभेला जाणार आहेत. आज सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अकोला शहराकडे ते रवाना होतील. तेथून पुन्हा सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात येतील. सव्वासहा वाजता क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पूतळ्यास अभिवादन केल्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर एका सभेला उपस्थित राहणार आहेत. सभा संपल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास अमित शाह दिल्लीला रवाना होतील.


