या वकिलाचा थेट आरोप : म्हणाले, फडणवीसांनी महाराष्ट्र नासवाला

या वकिलाचा थेट आरोप : म्हणाले, फडणवीसांनी महाराष्ट्र नासवाला

-प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांचा आरोप

प्रतिनिधी
इंदापूर : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने राज्यातील समीकरणे बदलली आहेत. राज्यात आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार यांचं बंड कायदेशीर आहे की बेकायदेशीर यावर आता चर्चा सुरू झाली आहे. तसेच या बंडावरून भाजपवरही टीका होऊ लागली आहे. एका प्रसिद्ध वकिलाने तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण नासवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. सध्या जे राजकारण सुरू आहे ते असंवैधानिकदृष्ट्या सुरू आहे. हे अतिशय चुकीच आहे असं माझं स्पष्ट मत आहे. घटनेच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी करणं म्हणजे जर चाणक्य नीति असेल तर ही चाणक्य नीति मतदारांच्याविरुद्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी या गोष्टीला नकार दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सगळे राजकारण नासवलेलं आहे. अत्यंत विद्रूप राजकीय चेहरा म्हणून ते पुढे आलेले आहेत, अशी टीका असीम सरोदे यांनी केली आहे.