पुन्हा सर्वसामान्यांना धक्का!: गृहकर्जाची ईएमआय वाढणार

पुन्हा सर्वसामान्यांना धक्का!: गृहकर्जाची ईएमआय वाढणार

-रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ

प्रतिनिधी
नवी दिल्ली : महागाईमुळे चिंतेत असलेल्या रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25% वाढ केली आहे. यामुळे रेपो दर 6.25% वरून 6.50% झाला आहे. म्हणजेच होम लोनपासून ते ऑटो आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महाग होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल. मंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एमपीसीची ही पहिलीच बैठक आहे.

व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी 6 फेब्रुवारीपासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होती. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास बुधवारी पत्रकार परिषदेत व्याजदराशी संबंधित घोषणा करतील. यापूर्वी डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर 5.90% वरून 6.25% करण्यात आले होते.

सहा वेळा बदल, 2.50% वाढ

चलनविषयक धोरणाची बैठक दर दोन महिन्यांनी होते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली. त्यानंतर RBI ने रेपो रेट 4% वर स्थिर ठेवला. पण RBI ने 2 आणि 3 मे रोजी तातडीची बैठक बोलावून रेपो दर 0.40% ने 4.40% ने वाढवला होता.

रेपो दरातील हा बदल 22 मे 2020 नंतर झाला. यानंतर, 6 ते 8 जून रोजी झालेल्या बैठकीत रेपो दरात 0.50% वाढ करण्यात आली. यामुळे रेपो दर 4.40% वरून 4.90% पर्यंत वाढला. त्यानंतर ऑगस्टमध्ये ते 0.50% ने वाढवून ते 5.40% वर नेले. सप्टेंबरमध्ये व्याजदर 5.90% वर गेले. त्यानंतर डिसेंबरमध्ये व्याजदर 6.25% वर पोहोचले. आता व्याजदर 6.50% वर पोहोचले आहेत.

महत्त्वाचे मुद्दे

चलनविषयक धोरण समितीच्या 6 पैकी 4 सदस्य व्याजदर वाढवण्याच्या बाजूने आहेत.

जगभरातील बहुतांश केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवले ​​आहेत.

ग्रामीण भागातील मागणीत वाढ होत आहे.

FY23-24 मध्ये महागाई 4% च्या वर राहण्याची शक्यता आहे.

FY23 मध्ये GDP 7% असण्याचा अंदाज आहे.

SDF 6% वरून 6.25% पर्यंत वाढले.

ग्रामीण भागातील मागणी पुनरुज्जीत होत आहे.

बाजारात पुरेशी तरलता आहे.