दावा: भारत जोडोला महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळेल

दावा: भारत जोडोला महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळेल

-चौथा आधारस्तंभाला अशी वागणूक चुकीची
-फडणवीसांवर पटोले यांचा हल्लाबोल

प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत तामिळनाडूपासून ते कर्नाटक आणि तेलंगणापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला देशात सर्वाधिक प्रतिसाद मिळेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्साह असल्याचे पटोले यांनी सांगितले. भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केवळ पराभवाच्या धास्तीमुळे घेत नसल्याचा आरोप पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदमध्ये केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सात तारखेपासून नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरपासून सुरुवात होत आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुभेच्छाम गृहावर पत्रकार परिषद घेतली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, युसुफ शेख, सरचिटणीस नामदेव पवार, अनिल पटेल यांची उपस्थिती होती.

– फडणवीसांनी वक्तव्याबाबत
माफी मागावी

नाना पटोले यांनी मनोहर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत जोरदार टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभाला अशा पद्धतीने वागणूक देणे चुकीचे असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. पत्रकार हे निर्भीडपणे बातम्या देण्याचे काम करतात. मात्र, आपल्या विरोधात कोणी लिहिले तर त्यांना दाबण्याचा हा प्रकार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

-भांडणाचे उद्योग कशासाठी?

आमदारांचे भांडण मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी पटविले यांनी सांगितले की, राज्यातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी आमदारांचे भांडण लावून प्रश्नापासून दुर्लक्ष करण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका पटोले यांनी केली. राज्यात मोठ्या प्रमाणात प्रश्न असताना राज्यातील उद्योग इतर राज्यात जात असताना त्यापासून लक्ष वळविण्यासाठी अशा पद्धतीने भांडण लावून लक्ष वळविले जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला.