अमरावतीत राणा दापंत्यावर कुणी केला प्रहार
– पत्रपरिषदेतून गंभीर आरोप
अमन कठाणे
अमरावती : शिवसेनेने हिंदूंसाठी केलेले कार्य हे जगजाहीर असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना राणा दाम्पत्याने धर्मविरोधी संबोधले. त्याचवेळी राणा दाम्पत्याने हिंदू धर्मासाठी कोणतेही मोठे कार्य केले नाही असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी मंगळवारी (ता. 4) रोजी दुपारी श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रपरिषदेत केला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार पदासाठी उमेदवार देणार आहे. उमेदवाराचे नावही ठरले असून ते नाव मी सांगणार नाही. याआधीही येथे 5 वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. स्थानिक काँग्रेस नेते त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करीत असले तरी वरिष्ठ स्तरावरूनच याबाबत निर्णय होणार असल्यामुळे शिवसेनेचाच उमेदवार असेल, असेही सुनील खराटे म्हणाले.
पत्रपरिषदेला सुनील खराटे यांच्यासह प्रदीप बाजड, धाने पाटील, विकास शेळके, संजय गव्हाळे, नीलेश सावळे, जिल्हा संघटक ज्योती अवघड, युवासेना प्रमुख पंकज चौधरी व इतर उपस्थित होते.


