Today Update : भाजपाच्या या नेत्याचे मोठे भाष्य, काँग्रेसची अवस्था अत्यंत कमकुवत

Today Update : भाजपाच्या या नेत्याचे मोठे भाष्य, काँग्रेसची अवस्था अत्यंत कमकुवत

-समन्वयाचा अभाव नेते अस्वस्थ

प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेस–मनसे युती झाली तर काँग्रेसला मतदान मिळणार नाही. त्यामुळे काँग्रेसने बिहार निवडणुकीच्या वेळी मनसे नको, अशी भूमिका जाणीवपूर्वक घेतली होती. आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना स्वीकारल्याने काँग्रेसकडे पर्याय नसल्यामुळे ते सोयीची भूमिका घेत असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महसूलमंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी ( २२ नोव्हेंबर )नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस–मनसे, भाजपचा प्रचार, यशोमती ठाकूर, कलोती, रुग्णालयांसाठी जागा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
बावनकुळे म्हणाले, काँग्रेसची अवस्था अत्यंत कमकुवत आहे. पक्षात कोणीच कुणाला सहन करत नाही. अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. समन्वयाचा अभाव असल्याने नेते स्वतःच अस्वस्थ आहेत. यशोमतीताईही त्याच कारणांमुळे बोलत असतील असेही म्हणाले. म्हणाले.
.कलोती हे उत्तम नेतृत्व आहे. जनतेने त्यांना अविरोध निवडून दिले आहे. चिखलदऱ्यात पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी त्यांनी काम सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले.

दुर्धर आजारांवरील उपचार करणाऱ्या, चॅरिटेबल ट्रस्ट किंवा सीएसआर अंतर्गत कमी शुल्कात सेवा देणाऱ्या रुग्णालयांना महसूलची जागा देण्याचा विचार आहे. जागा मिळाल्यास अधिक रुग्णांना फायदा होईल आणि आरोग्यसेवा मजबूत होईल.
भाजप–महा‍यूतीवर जनतेचा विश्वास
भाजप–महा‍यूतीवर जनतेचा विश्वास आहे. विकासाचे मुद्दे ठेवून काम केले आहे. डबल इंजिन सरकारच विकास करू शकते हे जनतेला ठाऊक आहे. ५१ टक्के मतांनी महायुती विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिथे महायुती झाली नाही, तिथे मतभेद होणार नाही याची काळजी घेतली जाईल,असे बावनकुळे म्हणाले.

सामना’तील लेखावर टीका
दैनिक सामनाला फार गंभीरपणे घेऊ नका. अस्वस्थ लोक त्यात लिहीत असतात; त्यामुळे त्याची चिंता करण्याची गरज नाही.”

भाजपच्या प्रचार सभांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी २५ नोव्हेंबरपासून १ डिसेंबरपर्यंत ४५ नगरपरिषद व पालिकांमध्ये जाणार आहेत. रवींद्र चव्हाणही विविध नगर परिषदांमध्ये जाणार आहेत. २८८ नगरपालिकांमध्ये आमदार, खासदार, आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह स्टार प्रचारकांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. सर्वत्र नियोजनबद्ध प्रचार सुरू असल्याचे बावनकुळे म्हणाले.