काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य : अडीच तासांच्या बैठकीत हे घडले

काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य : अडीच तासांच्या बैठकीत हे घडले

-सकाळी परतले महायुतीचे नेते

प्रतिनिधी
मुंबई : महायुतीच्या नेत्यांची बैठक दिल्लीत अमित शाह यांची भेट महायुतीच्या नेत्यांनी घेतली. त्यानंतर ही बैठक अडीच तास चालली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिन्ही नेते दिल्लीला गेले होते. जे पहाटे मुंबईत परतले. अडीच तास चाललेल्या बैठकीत काय काय चर्चा झाली ते महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं नाही. मात्र त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

महाराष्ट्रात महायुतीला एकूण २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी १३२ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. भाजपा १३२ आमदारांसह राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या आहेत. तर त्यांच्या शिवसेनेचे ४ पुरस्कृत आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे ६१ आमदारांचं बळ आहे. तर अजित पवार यांच्याकडे ४१ आमदारांचं बळ आहे कारण त्यांनी तेवढे आमदार निवडून आणले आहेत. असं असलं तरीही मुख्यमंत्री कोण होणार? हा सस्पेन्स कायम आहे.