कोविशिल्ड लसीवरून मृत्यू प्रकरण : या मोठ्या नेत्याने केली चौकशीची मागणी 

कोविशिल्ड लसीवरून मृत्यू प्रकरण : या मोठ्या नेत्याने केली चौकशीची मागणी 

-ईव्हीएम तक्रारी गांभीर्याने घ्या

प्रतिनिधी

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाने ईव्हीएम तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये असं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी इंडिया आघाडीतील एक सुयोग्य व्यक्ती एकमताने पंतप्रधानपदाचा उमेदवार होईल असंही म्हटलं आहे. तसेच संजय सिंह यांनी कोरोना लस कोविशिल्डमुळे झालेल्या मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी केली आणि त्यामागे कोण आहेत हे शोधून काढले पाहिजे असंही सांगितलं.

कंपनीच्या मालकांवर हत्येचा गुन्हा दाखल करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी. कोरोना लस कोविशिल्डचे गंभीर परिणाम होत आहेत.आज 25-30 वर्षांचे तरुण चालताना पडत आहेत. हे खरे आहे की आज लोक मरत आहेत आणि आज हे लोक कोविशिल्डमुळे मरत आहेत. त्याचे तथ्यही समोर आले आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मृत्यूवर कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करावी” असं आप नेत्याने म्हटलं आहे.

सजय सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, निवडणूक आयोगाने ईव्हीएम तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. ज्याठिकाणी ही तक्रार येईल तेथे त्वरित कारवाई करावी. इंडिया आघाडीतील एक सुयोग्य व्यक्ती एकमताने पंतप्रधानपदाचा उमेदवार होईल. याशिवाय, इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यास किमान समान कार्यक्रमही केला जाईल. विधानसभा निवडणुकीपर्यंत ही आघाडी कायम राहणार का, असे विचारले असता, वेळीच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दारू घोटाळ्यावर एसआयटी स्थापन केल्यावर आप नेते संजय सिंह म्हणाले की, “हरियाणात विषारी दारू प्यायल्याने 52 जणांना जीव गमवावा लागला. दारू घोटाळ्याने सर्व रेकॉर्ड उद्ध्वस्त केले, तरीही कारवाईच्या नावावर परिणाम काही नाही. भाजपाची सत्ता आल्यास ही देशातील शेवटची निवडणूक असेल. आरक्षणासोबतच संविधानही धोक्यात येणार आहे.