नवनीत राणा का म्हणाल्या? माझा बाप काढता… तुम्हाला…?
-अमरावतीत भरला उमेदवारी अर्ज
प्रतिनिधी
अमरावती : माझा राजकारण जनतेसाठी आहे.स्वतःचे घर भरण्यासाठी नाही. स्वतःच्या मालमत्ता वाढवण्यासाठी काही जण राजकारण करत आहेत. माझा बाप काढता माझ्या वडिलांनी सीमेवर कर्तव्य बजावले. ३३ महिन्यांचे सरकार होते. तेव्हा हनुमान चालीसा म्हटलं म्हणून मला १४ दिवस जेलमध्ये टाकलं. हे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना शोभलं का? माझ्यासारख्या लहान व्यक्तीला जेलमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही. ५ वेळा ज्यांनी या लोकसभा मतदारसंघाच नेतृत्व केलं. त्यांनी उमेदवार उभा केला नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
एक आमचा खूप चांगला मित्र आहे. तो मैत्रीपूर्ण वागून सर्वांचा उपयोग घेतो. तो मित्र रवी राणाचा बाप काढत आहे. नवनीत राणांचा बाप काढत आहे. रवी राणाचा बाप हमाल होता. नवनीत राणांचा बाप देशाची सेवा करत होता. जेव्हा एखाद्याचं लग्न असते. तेव्हा तिच्या परिवाराने शांत राहायचं असतं. म्हणून मी शांत आहे. रवी राणा नेहमी गोरगरिबांसमोर झुकलेला असतो, असं म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांचं नाव न घेता टीका केली आहे.


