या भाजपा नेत्याचा खासदारकीचा राजीनामा : केला या पक्षात प्रवेश
-हाती बांधून घेतले शिवबंधन
प्रतिनिधी
जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे. उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उन्मेष पाटील यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतले. यावेळी खासदार संजय राऊतही तिथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी “मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडावा यासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं” असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे.
“महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश करत आहे. ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेकजण विचारत आहेत की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राजकारण करताना आमदार, खासदार होणं हे एवढंच माझं ध्येय नव्हतं. मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो. परंतु, राजकारणात काम करताना, आमदार असताना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता. दुर्दैवाने किंमत मिळाली नाही.


