या मुद्यावरून मनोज जरांगे व छगन भुजबळात ‘दोन हात’

या मुद्यावरून मनोज जरांगे व छगन भुजबळात ‘दोन हात’

-आरक्षणाच्या निर्णयासाठी घेतला हा निर्णय

प्रतिनिधी
संभाजीनगर : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. तसेच जातीय जनगणना करण्याची मागणीही भुजबळ यांनी केली आहे. भुजबळांच्या या विधानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. आम्हीही थोडे नाही. आम्हीही एकटे मराठेच 54 टक्के आहोत. आम्ही शांततेत आंदोलन करणार. पण तुम्ही आव्हानच देणार असाल तर आमचाही नाईलाज आहे. चालू द्या मग. तुमचे 54 टक्के आहे का? जनगणनाच होऊ द्या आता. देशात आम्ही जवळपास 32 कोटी आहोत. आम्हीही काही कमी नाही. राज्यातही आम्ही 54 ते 60 टक्के आहोत. तुम्ही आम्हाला त्या वाटेवर येऊ देऊ नका. हात जोडून सांगतो. आमच्या पोरांना त्रास देऊ नका, असा निर्वाणीचा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांनी ओबसी नेत्यांवर गंभीर आरोप केले. मराठा समाज खचेल. मराठा समाजाचं कल्याण होणार नाही. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करायचं, मग आपला डाव यशस्वी झाला असं षडयंत्र ओबीसी नेत्यांचं सुरू आहे. हे खचले, केसेसला घाबरले, मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं केलं तर ते मागे हटतील, असं त्यांना वाटतंय. मराठ्यांचं शांततेत आंदोलन थोपवता येत नसल्यानेच हा डाव सुरू आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

आमचं आंदोलन डोळ्यात खुपू लागल्यानेच मराठ्यांच्या पोरांवर खोटेनाटे डाव टाकले जात आहेत. केसेस दाखल केल्या जात आहेत. हे थांबवा. तुम्ही नाही थांबवलं तर आम्ही समर्थ आहोत. आम्हालाही पुढचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. मग आमच्यापुढे पर्याय नसेल. पुन्हा गावबंदीच्या निर्णयाकडे आम्हाला येऊ देऊ नका. मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या पोरांच्या पाठी उभे राहावं. ओबीसी नेते त्यांच्या समाजाच्या पाठी जाहीर उभे आहेत. तुम्हीही राहा. तुम्ही नाही राहिले तर आम्ही खंबीर आहोत. तुम्ही उभं राहिला नाही तर आम्हाला कोणत्या नेत्याफित्याची काही गरज नाही. बघा मग आम्हाला पूर्वीच्या भूमिकेवर यावेच लागणार आहे, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला.