समृद्धीवर १२ जणांचा मृत्यू : पंतप्रधान मोदी यांचे ट्विट
-समृद्धीला कुणाची दृष्ट ?
प्रतिनिधी
नवी दिल्ली : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या आगर सायगावमध्ये हा अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 22 जण जखमी झाले आहेत. या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या भीषण अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच पीएम केअर फंडमधूनही मदत जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघाताबाबत ट्विट केलं आहे.


