मराठा ‎‎समाजाचे ओबीसीकरण खपून घेतले जाणार नाही

मराठा ‎‎समाजाचे ओबीसीकरण खपून घेतले जाणार नाही
-संविधान चौक ते ‎जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ‎

प्रतिनिधी
नागपूर : मराठा समाजाला सरसकट ओबीसी ‎‎प्रमाणपत्र दिले जाणार नाही आणि मराठा ‎‎समाजाचे सरसकट ओबीसीकरण केले ‎‎जाणार नाही, असे ठोस आश्वासन‎मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच‎राहील, असा निर्धार राष्ट्रीय ओबीसी ‎‎महासंघ आणि सर्व शाखीय कुणबी ‎ओबीसी आंदोलन कृती समितीने‎काढलेल्या मोर्चातून व्यक्त केला. ‎सोमवारी दुपारी दोन वाजता कृती ‎समितीतर्फे संविधान चौक ते ‎जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ‎काढण्यात आला.‎

आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे ‎‎पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ‎‎कुणबी प्रमाणपत्र देण्याची केलेली मागणी ‎‎चुकीची असल्याकडे लक्ष वेधण्यासाठी‎ ओबीसींनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ‎नेतृत्वात महामोर्चा काढला. यात ‎जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते सहभागी झाले‎ होते. वंशावळ किंवा १९६५ च्या पूर्वीच्या‎ कागदपत्रांमध्ये मराठा म्हणून नोंद ‎असल्यास मराठवाड्यातील मराठा‎ समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ‎आरक्षण देण्यास हरकत नाही. मात्र ‎सरसकट प्रमाणपत्र देण्यास आमचा‎ विरोध आहे. त्यामुळे सरकारने कागदपत्रे‎ नसलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नाही,‎ असे जाहीर करावे, अशी मागणी‎ मोर्चेकऱ्यांनी केली. सरकारने आम्हाला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चर्चेसाठी बोलवावे, आमच्या मागण्यांवर‎ बोलावे आणि लेखी आश्वासन द्यावे.‎ अन्यथा आंदोलन थांबणार नाही, असा ‎इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला. ‎मोर्चात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,‎माजी मंत्री सुनील केदार, महासंघाचे‎ अध्यक्ष बबनराव तायवाडे, सचिव शरद‎ वानखेडे, भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकरराव ‎कोहळे, माजी आमदार परिणय फुके,‎माजी आमदार अशोक धवड, आमदार‎ अभिजित वंजारी, आशिष देशमुख,‎ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे,‎राष्ट्रवादी ओबीसी आघाडी प्रदेशाध्यक्ष ‎ईश्वर बाळबुधे यांच्यासह कुणबी, तेली,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎माळी आदी संघटना मोर्चात सहभागी‎झाल्या होत्या.‎

चंद्रपुरात ओबीसी महासंघाचे विद्यार्थी ‎जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे ११ सप्टेंबरपासून‎ आमरण उपोषणाला बसले आहेत. त्याला ‎आठवडा लोटल्यावर राज्याचे वनमंत्री व‎जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार‎ यांनी उपोषणस्थळी भेट दिली. या‎ प्रश्नावर मंत्रिमंडळात चर्चा करू, असे‎ आश्वासन त्यांनी दिले. ओबीसी‎ विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह घोषणेची‎ तत्काळ अंमलबजावणी करावी,‎ जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎स्वाधार योजना लागू करावी, अशा ‎टोंगेंच्या मागण्या आहेत. त्यावर नक्की‎ कार्यवाहीचे आश्वासन देत मुनगंटीवार‎ यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली.‎मात्र, हा केवळ चंद्रपुरात वसतिगृहाचा ‎नव्हे तर राज्यभराचा प्रश्न आहे, असे‎ आंदोलकांनी ठणकावले. मग‎ मुनगंटीवारांनी बहुजन कल्याण मंत्री‎ अतुल सावेंशी आंदोलकांचा संवाद‎साधून दिला. त्यांनीही तेच आश्वासन ‎दिले. त्यावर टोंगे यांचे समाधान झाले‎नाही. त्यांनी माघारीस नकार दिला.‎त्यामुळे मुनगंटीवार यांची शिष्टाई‎ असफल ठरली.‎

-आमच्याकडे का पाठ ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व‎प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ओबीसी‎ नेत्यांची बैठक घ्यावी. त्यातून काही निष्पन्न‎झाले तर ठीक. अन्यथा आम्ही आंदोलन मागे‎घेणार नाही. जरांगे पाटील यांच्या‎ आंदोलनाला अर्धे मंत्रिमंडळ गेले. त्यांचे ‎उपोषण सोडवण्याआधी त्यांना सरकारने काय‎ आश्वासन दिले हे अजूनही बाहेर आले नाही.‎ मात्र, आमच्या आंदोलनाकडे सरकारने पाठ‎फिरवली असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे‎ महासचिव सचिन राजूरकर म्हणाले.‎