राज्यातील शासकीय वस्तीगृहाच्या सुरक्षेबाबत धोरण कधी?

राज्यातील शासकीय वस्तीगृहाच्या सुरक्षेबाबत धोरण कधी?
-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारला सवाल

प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील एकूणच शासकीय वस्तीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यासाठी प्रशाकीय अधिकारी नेमणार का व सुरक्षा संबंधित धोरण आखणार का असा सवाल आज परिषद सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

सावित्रीबाई फुले वस्तीगृह मुंबई येथे घडलेल्या प्रकाराबाबत वॉर्डन इतकेच प्रशासकीय अधिकारी दोषी आहेत. या घटनेला अधिकाऱ्यांचा ढिसाळपणा जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला. तसेच संबंधित घटनेतील आरोपी हा विना परवानगी तेथे राहत असल्याचेही दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
तसेच राज्यातील एकूणच वस्तीगृहांची स्थिती दयनीय आहे, त्यामुळे याबाबत सुरक्षा धोरण आखणे आवश्यक असून प्रशासकीय अधिकारी नेमण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले.