राहुलदादांचा लुक भारी, भारतासह जगभरात चर्चा

राहुलदादांचा लुक भारी, भारतासह जगभरात चर्चा

-या लूकची सर्वत्र चर्चा

वृत्तसंस्था
केंब्रिज : राहुल गांधी केंब्रिज जज बिझनेस स्कूलमध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांचा नवा लूक पाहायला मिळाला. राहुल गांधींचा हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी, भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर राहुल यांनी दाढी वाढवली होती. केंब्रिजला पोहोचल्यानंतर त्यांचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा तब्बल 6 महिन्यांनंतर ते दाढी सेट केलेले दिसले.केंब्रिज जज स्कूलने आपल्या ट्विटर हँडलवर राहुल यांच्या भेटीचा आणि त्यांच्या भाषणाचा विषय शेअर केला आहे.

राहुल गांधी केंब्रिज जज बिझनेस स्कूलमध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांचा नवा लूक पाहायला मिळाला. राहुल गांधींचा हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी, भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर राहुल यांनी दाढी वाढवली होती. केंब्रिजला पोहोचल्यानंतर त्यांचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा तब्बल 6 महिन्यांनंतर ते दाढी सेट केलेले दिसले.
मे 2022 मध्ये केंब्रिजला भेट

राहुल गांधी यांनी यापूर्वी मे २०२२ मध्ये केंब्रिज विद्यापीठाला भेट दिली होती. येथे त्यांना आयडियाज फॉर इंडिया या विषयावर बोलायचे होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले होते की, मोदी सरकार संसद आणि निवडणूक आयोगासारख्या देशातील घटनात्मक संस्थांना त्यांचे काम करू देत नाहीत. त्यांच्या विधानावर भाजपने आक्षेप घेतला होता. देशाच्या पंतप्रधानांवर असे वक्तव्य परदेशात का केले, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

राहुल केंब्रिजचे विद्यार्थी
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात रॉल विंची या नावाने शिक्षण घेतले. त्यांनी 1995 मध्ये डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये एमफिल केले. वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल यांच्या सुरक्षेची सर्वांनाच चिंता सतावत असल्याने हे नाव बदलावे लागले. राहुल यांच्या पदवीवरून वाद सुरू झाला तेव्हा केंब्रिजचे कुलगुरू प्रा. अॅलिसन रिचर्डनेही एक पत्र लिहून राहुलने रॉल विंचीच्या नावाने पदवी घेतल्याचे सांगितले