कोण म्हणाले? नाकाखालून गेलेले प्रकल्प परत आणा
-दावोसला काय जाता?
प्रतिनिधी
मुंबई : दावोसमधून काय येतय ते माहित नाही. पण तुमच्या नाकाखालून अनेक उद्योग गेले. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा. तुमच्या नाकाखालून गेलेले प्रकल्प परत आणा, असे खुले आव्हान शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, दावोसमध्ये काय होतं हे आम्हाला माहित आहे. वेदांत, फॉक्सकॉन, एअर बस, ड्रग्स पार्क हे प्रकल्प तुमच्या नाकासमोरून ते घेऊन गेले. ते परत आणा, तेव्हा मानू. तसेच कपिल सिब्बल यांचे वक्तव्य समोर आले आहे, त्यानुसार न्यायव्यवस्थेवरही हातोडा पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असेही संजय राऊत म्हणाले.
–कोरोनात अत्यंत पारदर्शक व्यवहार
ईक्बालसिंह चहल यांना ईडीसमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचा एनआयटी घोटाळा आम्ही बाहेर काढला. इतर अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. त्यावेळी ईडीला देखील याबाबत सांगितले आहे. या घोटाळ्यातील दोषींना कधी नोटीसा जातात, हे आम्ही पाहू. गोड बोलण्यासाठी स्वतःचा पक्ष सोडून भाजपमध्ये जावे लागत नाही, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी कृपाशंकर सिंह यांना लगावला


