थेट नार्को टेस्ट करा : नितेश राणेंचा या युवा नेत्यावर प्रहार
-खासदार राहुल शेवाळे यांच्या आरोपात तथ्य
प्रतिनिधी
नागपूर : सुंशात सिंह राजपूत आणि दिशा सानियाल मृत्यू प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (22डिसेंबर) विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली.
खासदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेमध्ये आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मी सुरुवातीपासूनच आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी करीत आहे. आता राहुल शेवाळे हे तेच बोलत आहे. या प्रकरणात सर्वच जण आदित्य ठाकरे यांचेच नाव घेते. शेवाळे त्यांच्या मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधील होते. मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अनेक वर्ष अध्यक्ष राहिले. पेट्या ही पाठविले. त्यावेळी ते चांगले होते.
रिया चक्रवर्तीला ४० वर मिस कॉल आहे. यात एयू असा उल्लेख आहे. एयू म्हणजे आदित्य ठाकरे आहेत. दिशा सानियाल प्रकरणातील काही पाने फाडण्यात आली असून शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला नाही.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे आहे. त्याचा तपास नव्याने सुरू करण्यात यावा. सुशांत सिंह, रिया चक्रवर्ती, दिशा सालियान यांची नावे जेव्हा-जेव्हा पुढे येतात तेव्हा आदित्य ठाकरे यांचही नाव पुढे येते. तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.


