खळबळजनक: बच्चू कडू शिंदे सरकारचा पाठिंबा काढणार

खळबळजनक: बच्चू कडू शिंदे सरकारचा पाठिंबा काढणार

– प्रहारच्या कार्यकर्त्यांचे पोटतिडकीचे मत
– अमरावतीच्या बैठकीत निर्णय घेऊ
प्रतिनिधी
नागपूर : अपक्ष आमदारांचा मला पाठिंबा आहे. सरकारमधून बाहेर पडावे, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. आपला गेम होईल, अशा पद्धतीचे कार्यकर्ते संदेश पाठवत आहे. सोमवारी रात्री उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर बैठक आहे. या बैठकीत काय ठरते, त्यानंतर निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांचे मन दुखावलले आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली.

सागर बंगल्यावरील बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे माहित नाही. या चर्चेत काय ठरते. त्यानंतर आम्ही अमरावतीत उद्या, मंगळवारी कार्यकर्त्याची बैठक बोलावली आहे. बैठकीत समाधानकारक निर्णय झाला तर नक्कीच कुठेतरी या वादावर पडदा पडू शकतो, असे संकेत कडू यांनी दिले. आमदारांनी पैसे घेतले नाही, असे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सत्तेतील घरातील माणूस जेव्हा आरोप करतो तर नाराजीचा सूर असणारच आहे.
गिरीश महाजन यांच्याशी आताच बोलणे झाले आहे.

-रवी राणा यांनी नाहक बदनामी केली
सागर बंगल्यावर रात्री दहा वाजताच्या सुमारात बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे उपस्थित राहील. तसेच मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रवी राणा यांनी नाहक बदनामी केली आहे. सोमवारच्या बैठकीत आमचे समाधान झाले नाही तर आम्ही फुटाण्यासारखे फोडून काढू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

-प्रसंगी,सभेचे रूपांतर आंदोलनात
एक तारखेच्या अनुषंगाने महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते अमरावती येथे येणे सुरू झाले आहे. पुणे, सातारा, रत्नागिरी येथून अमरावतीला कार्यकर्ते येत आहे. समाधानकारक उत्तर मिळाले तर आंदोलनाचे रूपांतर मेळाव्यात करू आणि समाधान नाही झाले तर त्याचे रूपांतर निषेध सभेत करू, असेही कडू म्हणाले. 15 वर्षे सातत्याने विरोधात लढत आलो. मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा होता म्हणून महाविकास आघाडीमध्ये सामील झालो. पण, आघाडी मधात तुटली. आता नवीन समीकरण जुळले. या सगळ्या गोष्टी अर्धवट राहिल्या.