अंधेरी निवडणूक: राज ठाकरेंच्या पत्राने नवा टि्विस्ट
प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. ठाकरे यांच्या भूमिकेवरून आश्यर्य व्यक्त होत आहे.
अंधेरी पोटनिवडणूक भाजपाने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे पहावे, असे आवाहन राज ठाकरेंनी फडणवीसांना केले आहे. त्याला फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी केलेल्या मागणीचा विचार करू. मात्र, याबाबत पक्षात चर्चा करावी लागेल, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
-‘राज ठाकरेंचे पत्र’
एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे.आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.
माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.
मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं.
असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.
आपला मित्र,
-राज ठाकरे

राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र:अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं; नक्की विचार करू-फडणवीस
अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे पहावं, असे आवाहन राज ठाकरेंनी फडणवीसांना केले आहे. त्याला फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले असून राज ठाकरेंनी केलेल्या मागणीचा विचार करू. मात्र, याबाबत पक्षात चर्चा करावी लागेल, असे फडणवीसांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेले पत्र
एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.
माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात. तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचे धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसे करावे असे मला माझे मन सांगते.
असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा सस्वी कार कराल.
आपला मित्र,
राज ठाकरे
-नक्की विचार करू- फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने पत्र लिहिले आहे. त्याबाबत नक्की विचार करू. मात्र, पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा करावी लागेल. त्या बैठकीतच याबाबत निर्णय घेतला जाईल.
-राज यांच्या भूमिकेमुळे आश्चर्य
राज ठाकरे यांनी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत भाजप मनसेचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात होते. तसेच, शिवसेनेतील बंडानंतर राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेही ते या पोटनिवडणुकीत शिंदे गट व भाजपसोबत जातील, असे बोलले जात होते. मात्र, आज राज ठाकरे यांनी अचानक ऋतुजा लटके यांना आमदार होता यावे, यासाठी फडणवीसांना पत्र पाठवल्याने, त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे अंधेरी पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप व शिंदे गटाचे सर्व बडे नेते मैदानात प्रचारासाठी उतरणार आहेत. स्वत: आशिष शेलार पुढे 15 दिवस अंधेरीत तळ ठोकणार आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे प्रचारात कोणतीच कसर सोडताना दिसत नाहीये. अशा स्थितीत फडणवीस राज ठाकरेंची विनंती मान्य करतील, अशी शक्यता कमी वर्तवली जात आहे. तरीदेखील राज ठाकरेंनी अशी भूमिका का घेतली? पूर्वीपासून अशीच भूमिका होती तर पूर्वीच तसे जाहीर का केले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.सध्या फडणवीस या पत्राला काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे तसेच रंजक ठरणार आहे.


