अखेर सोनम वांगचूक यांनी का सोडले २६ व्या दिवशी उपोषण

अखेर सोनम वांगचूक यांनी का सोडले २६ व्या दिवशी उपोषण

-अनेक अटींवर झालेली प्रदीर्घ चर्चा

प्रतिनिधी
नवी दिल्ली : सोनम वांगचुक यांनी अखेर २६ दिवसांनी उपोषण सोडले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी बेमुदत उपोषणावर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री २६ व्या दिवशी उपोषण सोडले.

केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह आणि ‘ॲपेक्स बॉडी ऑफ लेह लडाख’च्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी उपोषण सोडले. “अनेक अटींवर झालेली प्रदीर्घ चर्चा आणि देशातील संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला”, असे वांगचुक यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या अटींची माहिती लवकरच देणार असल्याचेही त्यांनी म्हटलंय.

-पंतप्रधान मोदींचा संदेश
नीट पेपरफुटी प्रकरणी गेल्या ३० दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरु आहे. २० जुलै रोजी झालेल्या लाठीमारच्या प्रकारानंतर देशात त्याचे पडसाद उमटले. दरम्यान, पेपरफुटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उशीरा रात्री एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन संदेश दिला. पेपरफुटीतील गुन्हेगारांसाठी कठोर कायदा आणण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. यानंतर काही वेळातच सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याचेही वृत्त समोर आले आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी उपोषण सोडले. दरम्यान, अनेक अटींवर आणि देशातील संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन उपोषण सोडल्याचे वांगचुक यांनी म्हटले आहे.

-वांगचुक काय म्हणाले?
मी अखेर २६ दिवसांनंतर माझे उपोषण सोडले आहे. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या ६५ खासदारांनी माझी भेट घेऊन किंवा पत्रांद्वारे मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. अनेक अटींवर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आणि देशातील संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेत आहे. या अटींची सविस्तर माहिती मी लवकरच एका स्वतंत्र व्हिडिओद्वारे स्पष्ट करेन. यादरम्यान, मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो की, कुठेही आणि कोणत्याही स्वरूपाचा हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या, असे स्पष्ट करत महत्वाचे आवाहन वांगचुक यांनी केले आहे.