अतिशय दुःखद बातमी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन

अतिशय दुःखद बातमी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन

-अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू

प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने अपघातस्थळाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.