हे वाचाच ! नागपुरात नाना पटोले या मतदार संघातून करताहेत तयारी
-भाजपाच्या या नेत्याने स्पष्ट सांगितले
प्रतिनिधी
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणारा आहे. निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने जोरदार तयारी करण्यात येत आहे. मात्तबर नेत्यांना या निवडणुकीत उतरवून आपल्या जास्त जागा कशा निवडून येतील यावर महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा भर आहे. अशातच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभा लढविणार की विधानसभा यावर नागपूरमधील एका बड्या नेत्याने महत्वाचं विधान केलंय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले खासदार म्हणून निवडून आले होते.
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा सुमारे 1.5 लाख मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता. तर, 2019 मध्ये नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूरमधून निवडणूक लढविली होती. पण, गडकरी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
नाना पटोले हे भंडारा-गोंदियामधील साकोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भंडारा-गोंदिया हा खऱ्या अर्थाने भाजपचा गड आहे. सातत्याने दोन-तीन दशकापासून भंडारा येथील खासदार, आमदार हे बहुसंख्याने भाजपचे आहेत. नाना पटोले यांना हा गड त्यांचा आहे असे जर वाटत असेल तर ते दक्षिण नागपूरमधून 2024 ची निवडणुकीची तयारी का करत आहेत असा सवाल नागपूरचे माजी आमदार आणि भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलाय.


