हे ठरले कारण : गोविंदाने या पक्षात घेतला प्रवेश

हे ठरले कारण : गोविंदाने या पक्षात घेतला प्रवेश

-मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा यचा पक्षप्रवेश झाला. गोविंदा शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एकनाथ अभिनेता गोविंदा याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात गोविंदा याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं. यावेळी गोविंदाने आपली भूमिका मांडली. गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आज गेला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोविंदा एकाच गाडीतून प्रवास करुन बाळासाहेब भवन येथे दाखल झाले. यानंतर इथे गोविंदाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

नमस्कार, जय महाराष्ट्र! मी आज एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो. मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी आज या पक्षात प्रवेश करतोय. मी राजकारणातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की मी पुन्हा राजकारणात येईल. पण 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर मी जिथे आहे त्याच पक्षात एकनाथ शिंदे यांच्या कृपाने पुन्हा या पक्षात आलोय. मी सर्वांचे आभार मानतो. मी राजकारणापासून लांब जात होतो. मी धन्यवाद देतो. पण आपल्याकडून मला मिळालेली ही जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडेन. मी सेवा प्रदान करेन. मी कला आणि संस्कृतीसाठी काम करेन. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे”, असं गोविंदा म्हणाला.

फिल्मसिटी मॉर्डन आहेच. मुंबई आधीपेक्षा जास्त सुंदर दिसतेय. विकास दिसतोय. एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईथ विकास दिसतोय. रस्ते असो, सौंदर्यकरण असो, याला सुरुवात झालीय. माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांची कृपा राहिली”, असं गोविंदा म्हणाला. “एकनाथ शिंदे यांचं व्यक्तीमत्व मला आवडलं. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला”, असं गोविंदा म्हणाला.