हे कारण : या महिला नेत्याची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
-जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान
प्रतिनिधी
सोलापूर : देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम आहेत अशी टीका काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला. त्यानंतर महायुतीला महाप्रचंड असं २३७ जागांचं बहुमत मिळालं. याबाबतच्या प्रतिक्रिया सातत्याने आल्या होत्या. अजूनही त्याबाबतच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
–काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
प्रणिती शिंदे म्हणाल्या, वाढलेल्या मतदार संख्येच्या आकडेवारीवर आम्ही शंका उपस्थित केली आहे. २०१९ ते २०२४ दरम्यान मिळालेल्या आकडेवारीनुसार जवळपास ५ लाख मतदार संख्या वाढली होती. लोकसभा निवडणूक २०२४ ते विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान ७५ लाख मतदार संख्या कशी काय वाढली? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही, तोपर्यंत आमचा विश्वास बसणार नाही, असंही त्या म्हणाल्या. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी राष्ट्रीय मतदारदिना निमित्त काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे कामकाज करत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, तरीही या संस्थेवर भयंकर अशा दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.


