सुप्रिया सुळे यांचे मोठे भाष्य : या अभिनेत्यावर घरात शिरून चाकूहल्ला
-म्हणाल्या, ही घटना चिंता वाटणारी
प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी सैफच्या कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यानंतर माध्यमांना याबाबतची माहिती दिली. सैफवर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
–काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की सैफ अली खान यांच्या कुटुंबाशी मी संवाद साधला. मात्र त्यांची प्रायव्हसी ही महत्त्वाची आहे. काही वेळातच त्यांच्याकडून आणि पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल. सैफ अली खान सेफ आहेत आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबाकडून याबाबत अधिकृतरित्या याची माहिती येईल तोपर्यंत आपण वाट बघू. हल्ला कसा झाला? काय घडलं मला माहीत नाही. ही घटना चिंता वाटणारीच आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ द्या त्यानंतर काय प्रतिक्रिया द्यायची? गृहमंत्र्यांशी बोलायचं का? हे मी ठरवेन असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
–मुंबई पोलीस म्हणतात…


