वाचा सविस्तर; आता भारताचा ब्रिटनमध्ये डंका

वाचा सविस्तर; आता भारताचा ब्रिटनमध्ये डंका
-भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक पंतप्रधान पदाचे दावेदार
वृत्तसंस्था
ब्रिटन : ब्रिटनमधून भारतासाठी लवकरच चांगली बातमी येऊ शकते. भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचे भाग्य लवकरच उजळू शकते. ते पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर सुनक यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. ब्रिटनमध्ये यावेळी ‘ये दिवाली भारतवाली’चा गजर सुरू आहे.

45 दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या स्थायी सदस्यांच्या मतदानात सुनक यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र आता सुनक यांचा वरचष्मा आहे. परिस्थिती अशी आहे की, माजी पंतप्रधान जॉन्सन यांनी मागच्या दारातून सुनक यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद ऑफर केले होते, परंतु सुनक गटाचे म्हणणे आहे की ते आधीच अर्थमंत्री असताना ही ऑफर का स्वीकारतील, सुनक हे स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील.

-पेनी होऊ शकतात सुनक किंवा जॉन्सन यांच्या नंबर-2
पुन्हा होणाऱ्या निवडणुकीत तीन खासदारांची नावे प्रमुख दावेदार म्हणून पुढे आली आहेत. सुनक यांच्याव्यतिरिक्त माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या अध्यक्षा पेनी मॉर्डोंट आहेत. पेनी मॉर्डंट या सुनक किंवा जॉन्सन यांच्या नंबर 2 होऊ शकत असल्याचे मानले जाते. तज्ज्ञ म्हणतात की, पॉवर ट्रँगलमध्ये, पेनी या सुनक किंवा जॉन्सन यांच्या गटात जाऊ शकतात. तसे पाहिले तर पेनीही पंतप्रधानपदाची उमेदवारी करत आहेत.

-यावेळी असे आहे नवे नियम
उमेदवाराला 100 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे, गेल्या वेळी 20 खासदारांची गरज होती. पक्षाचे स्थायी सदस्य मतपत्रिकेद्वारे नव्हे, तर ऑनलाइन मतदान करतील.
ऋषी नीती : समर्थक खासदार वाढवणे, मतदान करणाऱ्या सदस्यांपर्यंत न जाणे

ट्रसविरुद्धच्या यापूर्वीच्या लढतीत सुनक हे कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या स्थायी सदस्यांच्या मतदानातून बरेच काही शिकले आहेत. यावेळी त्यांना पक्षाच्या सदस्यांच्या मतदानापर्यंत स्पर्धा घ्यायची नाही. खासदारांच्या मतदानात सुनक पुढे होते. पक्षाच्या सदस्यांच्या मतदानात सुनक यांना 60,399 तर ट्रस यांना 81,326 मते मिळाली. सुनक स्वतःचे 100 खासदार आणि विरोधकांचे 100च्या खाली ठेवण्याच्या रणनीतीत आहेत.

-बँकरची प्रतिमा
ट्रस यांच्या पंतप्रधानपदी अपयशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आर्थिक आघाडीवर आलेले अपयश. सुनक हे व्यावसायिक बँकर आहेत. जॉन्सन सरकारमध्येही ते अर्थमंत्री होते. ब्रिटनची आर्थिक बेल आउट योजना, त्यांनी लोकांसमोर ठेवली, त्याचे मध्यमवर्गाने खूप कौतुक केले. अशा परिस्थितीत सुनक पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वत:ला बँकर राजकारणी म्हणून सादर करण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत.

-निवडणुकीचा धोका
पंतप्रधानांच्या वारंवार होणाऱ्या बदलांमुळे सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाची प्रतिमा डागाळत चालली आहे. विरोधी मजूर पक्षाची लोकप्रियता 25% वाढली आहे. ब्रिटनमध्ये नव्या निवडणुकीसाठी दोन वर्षांचा कालावधी आहे. सुनक स्वत:चे नेतृत्व ठसवत आहेत आणि पक्षाच्या खासदारांना मुदतपूर्व निवडणुकीची धमकी देत ​​आहेत. सुनक यांच्यामुळे स्थैर्य आल्यास त्यांचा खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण होईल, असा विश्वासही खासदारांना आहे.