वाचा! वर्धेच्या भाजपा उमेदवाराची आहे इतकी संपत्ती

  • वाचा! वर्धेच्या भाजपा उमेदवाराची आहे इतकी संपत्ती

-दहा बँकात इतके रुपये

प्रतिनिधी
वर्धा : भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी आपले उत्पन्न दाखवताना विविध स्रोतांचा उल्लेख केला आहे. शेती, पेट्रोल पंप, घरभाडे, व्यवसाय, वेतन, अशा विविध माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तडस यांच्या विविध दहा बँक खात्यात साडेसहा लाख रुपयांची रक्कम जमा असून सर्वाधिक रक्कम दिल्लीच्या बँक खात्यात आहे, तर पत्नी शोभा तडस यांच्या बँक खात्यात साडेतीन लाख रुपये जमा आहे. एका रुग्णवाहिकेसह तीन वाहने, साडेसात किलो चांदी व अडीचशे ग्रॅम सोने तर पत्नीकडे साडेतीनशे ग्रॅम सोने व दीड किलो चांदी आहे.

सेवाग्राम, भिडी येथे शेतजमीन, तडस कॉम्प्लेक्स येथे दोन गाळे, पत्नीच्या नावे पेट्रोलपंप व लॉन, सभागृह आहे. देवळी व वर्धा येथे निवासी इमारत, नागपुरात फ्लॅट, सेवाग्रामला फार्महाऊस आहे. वाहनासाठी विविध स्वरुपात १८ लाख रुपयांचे कर्ज आहे. जंगम व स्थावर मालमत्ता २ कोटी २३ लाख रुपयांची दाखवण्यात आली आहे. अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकरणात दोषारोप पत्र ठेवण्यात आलेले नाही.