मुंबईत राज ठाकरेंची गर्जना : ज्ञानेशकुमारांशिवाय केल्या या मागण्या
-एसआरआय रद्द झाला पाहिजे.
प्रतिनिधी
मुंबई : देशातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गैरप्रकार केल्याचं समोर आल्यानंतर देशभर जनक्षोभ उसळला आहे. ठिकठिकाणी आंदोलन होत असून ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, आज ठाकरे बंधूंनीही मुंबईत गर्जना मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्यातील पहिली मागणी म्हणजे आता झालेली एसआयआर प्रक्रिया रद्द करा. राज ठाकरे म्हणाले, “जो आतापर्यंत एसआरआय झाला तो रद्द झाला पाहिजे.” यावेळी त्यांनी माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी नोंदवलेलं मतही यावेळी सांगितलं.
-एसआयआरमधून दोन कोटी लोक बाहेर
राज ठाकरे म्हणाले की, माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांच्यामते, स्पेशल रिव्हिजन ही अपवादात्मक परिस्थितीत कारणे लेखी नोंदवून आणि विशिष्ट मतदारसंघापुरता करता येते. संपूर्ण भारतात एसआयआर करणे बेकायदेशीर आहे. याबाबत कायद्यातच तरतूद नाही. समजा एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली, पूर, भूकंप, स्थलांतर, खूप दुबार नावं आहेत, अशा तक्रारी आल्या तर एसआयआर केलं जाऊ शकतं. त्यामुळे आता जे प्रकरण सुरू आहे, ते बेकायदेशीर आहे. विधानसभेवेळी मतदार वाढवायचे आणि आता एसआयआरमध्ये दोन कोटी लोक बाहेर काढले. हे आमचे मतदार आहेत? ते कोण आहेत? म्हणून सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यावेळी एसआयआर रद्द झाला पाहिजे.
मी २०१७ ते २०१८ पासून मी सांगत होतो, की मतचोरी होते आहे. सोनिया गांधी असोत, ममता बॅनर्जी असोत मी सगळ्यांची भेट घेतली होती. निवडणुकांवर बहिष्कार टाका, कारण तोपर्यंत पारदर्शक कारभार होणार नाही. अशा पद्धतीने मतं कमी होऊ शकत नाहीत आणि मतं अशी वाढू शकत नाहीत. मी हा दावा केला होता की मतचोरी होते आहे असं राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सांगितलं आहे. मी जे तेव्हा म्हणत होतो ते आत्ता सगळ्यांना म्हणत होतो. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत महायुतीला मिळालं. महाराष्ट्रात काय सन्नाटा, जल्लोष नाही. असा कुठला विजय असतो? जिथे विजय मिळाल्यानंतर लोकांमध्ये उत्साह किंवा जल्लोष नसतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ही निवडणूक पार पडली होती. त्यात ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. असा कुठला व्हायग्रा आहे की दणादण मतदार वाढले? असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला.
मला सत्ताधारी पक्षाला एकच सांगायचं आहे की आम्हाला कुठलाही राग नाही किंवा आसूया नाही. तुम्ही सत्ता कशी राबवता आहात आणि कशातून राबवत आहात त्याचा आम्हाला राग आहे. लोकांनी ठरवावं की कुणाला सत्तेत बसवायचं आणि कुणाला विरोधात. लोकांनी ठरवलं पाहिजे, निवडणूक आयोगाने नाही. सध्या मनमानी कारभार सुरू आहे, एकाच उद्योगपतीला विमानतळं दिली, जंगलं दिली, पोर्ट दिले. काय चाललंय काय? आम्ही काही केलं तरी फरक पडत नाही हे निवडणूक आयोगाला बांधल्यामुळे होतं आहे. या देशातल्या जनतेने काहीही बोलावं, काहीही सांगावं, निवडणूक आयोग आमच्यासह असेल तर आम्ही मनाला येईल तसं वागू. आम्हाला अमेरिकेला सरेंडर व्हायचं आहे तर होऊ, पेट्रोलचे भाव वाढवू, तुम्हाला रांगेत उभं करू. कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असतो तेव्हा त्यांना भीती असते. लोकांनी मतदान केलं नाही तर आपली सत्ता जाईल, अशी कुठलीही भीती महाराष्ट्रातही नाही, केंद्रातही नाही कुठेही दिसत नाही असंही राज ठाकरे म्हणाले. यांच्या काळात फक्त एक उद्योगपती मोठा होताना दिसतो आहे. ही हिंमत आली कुठून? सगळी चॅनल्स आम्ही ताब्यात घेतली, निवडणूक आयोग ताब्यात घेऊन ठेवला आहे. सत्तेतल्या कुठल्याही पक्षाने विचार केला पाहिजे की आपलं आजचं चुकीचं पाऊल, धोरण हे पुढच्या काळात पायंडा होणार का?


