महाराष्ट्रात भाजपा बॅकफूटवर; राहील महाविकास आघाडीचा डंका

महाराष्ट्रात भाजपा बॅकफूटवर; राहील महाविकास आघाडीचा डंका

– ‘इंडिया टुडे-सी व्होटर’चा सर्व्हे

प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात आज लोकसभेची निवडणूक झाली तर महाराष्ट्रातील निकाल कसे लागतील? राज्यात सत्ताधारी भाजप-शिंदे आघाडी आपले वर्चस्व अबाधित ठेवेल की महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारेल?, याविषयी ‘इंडिया टुडे-सी व्होटर’ने एक सर्व्हेक्षण जारी केले आहे. त्यातील आकडेवारी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची झोप उडवणारी, तर महाविकास आघाडीला दिलासा देणारी आहे.

या सर्व्हेनुसार, देशात आज लोकसभेची निवडणूक झाली तर केंद्रातील सत्ताधारी एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल. आकडेवारीनुसार यावेळी काँग्रेसच्या कामगिरीत किंचीत सुधारणा झाली आहे. पण त्याचा त्या पक्षाला कोणताही फायदा होताना दिसून येत नाही. कारण, भाजपला सत्तेतून बेदखल करण्याएवढ्या जागा काँग्रेसला कुठेही मिळताना दिसत नाहीत. या आकडेवारीनुसार, काँग्रेसला 100 च्या आत जागा मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया टुडे- सी व्होटर’च्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला (भाजप-शिंदे गट-रिपाइं) केवळ 14 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप युतीला सर्वाधिक 42 जागा मिळाल्या होत्या. तर विरोधकांना केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले होते. पण यावेळी भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता असल्यामुळे हा अहवाल राज्यातील भाजप नेत्यांची झोप उडवणारा ठरणार आहे.

या सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना 39 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना 16 टक्के नागरिकांनी पसंती दिली. ते या प्रकरणी दुसऱ्या क्रमाकांवर आहेत.

त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसऱ्या (7 टक्के पसंती), तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन चौथ्या (5 टक्के पसंती), ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पाचव्या (3 टक्के पसंती), आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा 6व्या (3 टक्के पसंती), मध्य प्रदेशचे सीएम शिवराज सिंह चौहान 7व्या (2.4 टक्के पसंती) क्रमांकावर आहेत.

या क्रमवारीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना केवळ 2.2 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे.

देशात आज लोकसभेची निवडणूक झाली तर महाराष्ट्रातील निकाल कसे लागतील? राज्यात सत्ताधारी भाजप-शिंदे आघाडी आपले वर्चस्व अबाधित ठेवेल की महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारेल?, याविषयी ‘इंडिया टुडे-सी व्होटर’ने एक सर्व्हेक्षण जारी केले आहे. त्यातील आकडेवारी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची झोप उडवणारी, तर महाविकास आघाडीला दिलासा देणारी आहे.

या सर्व्हेनुसार, देशात आज लोकसभेची निवडणूक झाली तर केंद्रातील सत्ताधारी एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल. आकडेवारीनुसार यावेळी काँग्रेसच्या कामगिरीत किंचीत सुधारणा झाली आहे. पण त्याचा त्या पक्षाला कोणताही फायदा होताना दिसून येत नाही. कारण, भाजपला सत्तेतून बेदखल करण्याएवढ्या जागा काँग्रेसला कुठेही मिळताना दिसत नाहीत. या आकडेवारीनुसार, काँग्रेसला 100 च्या आत जागा मिळण्याचा अंदाज आहे.

-काय आहे महाराष्ट्रातील स्थिती?

‘इंडिया टुडे- सी व्होटर’च्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला (भाजप-शिंदे गट-रिपाइं) केवळ 14 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप युतीला सर्वाधिक 42 जागा मिळाल्या होत्या. तर विरोधकांना केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले होते. पण यावेळी भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता असल्यामुळे हा अहवाल राज्यातील भाजप नेत्यांची झोप उडवणारा ठरणार आहे.

आज निवडणूक झाली तर कुणाला किती जागा मिळणार? (एकूण जागा 543)

एनडीए298यूपीए153इतर92

कोणत्या आघाडीला किती टक्के मतदान?

एनडीए43यूपीए30इतर27

कोणत्या पक्षाला किती मतदान?

भाजप39 टक्केकाँग्रेस22 टक्केइतर39 टक्के

या सर्वेनुसार, लोकसभेची आज निवडणूक झाली तर NDAला अनेक राज्यांत फायदा होण्याची शक्यता आहे.

NDAला कोणत्या राज्यांत होणार फायदा?

आसाम12 जागा (2019 मध्ये 9 जागा)तेलंगणा6 जागा (2019 मध्ये 4 जागा)पश्चिम बंगाल20 जागा (2019 मध्ये 18 जागा)उत्तर प्रदेश70 जागा (2019 मध्ये 64 जागा)

-UPA ला कोणत्या राज्यांत फायदा ?

कर्नाटक17 जागा (2019 मध्ये 2 जागा)महाराष्ट्र 34 जागा (2019 मध्ये 6 जागा)बिहार 25 जागा (2019 मध्ये केवळ 1 जागा)

मुख्यमंत्री शिंदे 8 व्या स्थानी

या सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना 39 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना 16 टक्के नागरिकांनी पसंती दिली. ते या प्रकरणी दुसऱ्या क्रमाकांवर आहेत.

त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसऱ्या (7 टक्के पसंती), तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन चौथ्या (5 टक्के पसंती), ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पाचव्या (3 टक्के पसंती), आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा 6व्या (3 टक्के पसंती), मध्य प्रदेशचे सीएम शिवराज सिंह चौहान 7व्या (2.4 टक्के पसंती) क्रमांकावर आहेत.

या क्रमवारीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना केवळ 2.2 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे.

NDA सरकारच्या कामगिरीवर मतदार समाधानी

इंडिया डुटे – सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, कोविड काळातील NDA सरकारच्या कामगिरीवर मतदार समाधानी आहेत. 20 नागरिकांच्या मते NDA सरकारने कोरोना परिस्थिती योग्यरित्या हाताळली. तर 14 टक्के लोकांच्या मते मोदी सरकारची दुसरी मोठी कामगिरी ही कलम 370 रद्द करण्याची आहे. याशिवाय 12 टक्के लोकांच्या मते राम मंदिर ही आणखी एक NDA सरकारची मोठी कामगिरी आहे.

NDAचे सर्वात मोठे अपयश

या सर्व्हेनुसार, 25 टक्के नागरिकांनी महागाई हे एनडीए सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे म्हटले आहे. तर 17 टक्के मतदारांनी बेरोजगारीच्या मुद्यावर मोदी सरकारला अपयश आल्याचा दावा केला आहे. 8 टक्के नागरिकांनी कोरोना काळात एनडीए सरकारला स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचाही दावा केला आहे.