पुन्हा कोश्यारींचा कित्ता; राज्यपाल बैंस यांनी सांगितला चुकीचा इतिहास

पुन्हा कोश्यारींचा कित्ता; राज्यपाल बैंस यांनी सांगितला चुकीचा इतिहास
-काय आहे इतिहास

प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैंस हे एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. बैंस यांनी एका कार्यक्रमात बोलताना बाजीराव पेशव्यांनी जंजिरा सिद्धी जोहरच्या ताब्यातून मुक्त केला असे वक्तव्य केले आहे.

या प्रकरणी इतिहास अभ्यासक विश्वास पाटील यांच्याशी संपर्क करत नेमका इतिहास काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, जंजिरा हा अजिंक्य किल्ला आहे, तो स्वराज्यात कधीही आला नाही. तो मिळविण्यासाठी शिवाजी महाराज, आणि संभाजी महाराजांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यात यश आले नाही.

इतिहास अभ्यासक विश्वास पाटील म्हणाले की, जंजिरा हा किल्ला अजिंक्य राहिला आहे. तो स्वराज्यात कधीही आला नाही, शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी झाले. सिद्धीच्या ताब्यातून बाजीराव पेशव्यांनी कधीही हा किल्ला जिंकला नाही. हा किल्ला नेहमी अजिंक्य राहिला आहे. शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही, म्हणून त्यांनी बाजूला पद्मदुर्ग बांधला. संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी पाण्यात सेतू बांधून प्रयत्न केला. मात्र, तेव्हा औरंगजेब मिनवायला आल्यामुळे त्यांना तो किल्ला सोडून द्यावा लागला. याआधी शिवाजी महाराजाच्या काळात शामजीपंत पेशवे या सरदाराला शिवरायांनी हा किल्ला जिंकण्यासाठी पाठविले होते, पण त्यांचाही तेव्हा पराभव झाला. हा किल्ला ब्रिटीशांना आणि पोर्तुगीज यांना देखील जिंकता आला नाही.

राज्यपाल रमेश बैंस म्हणाले की, बाजीराव पेशव्यांनी जंजिरा किल्ला हा सिद्धीच्या तावडीतून मुक्त केला. मात्र, हा किल्ला 1617 ते 1947 अशी 330 वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला आहे. त्यामुळे चुकीचा इतिहास सांगितला म्हणून राज्यपाल बैंस चर्चेत आले आहेत. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील त्यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहत आले आहेत. यात आता नव्या राज्यपालांनी खोटा इतिहास सांगिल्याने ते देखील चर्चेत आले आहेत.

राज्यपाल रमेश बैंस म्हणाले की, बाजीराव पेशव्यांनी जंजिरा किल्ला हा सिद्धी जौहरच्या तावडीतून मुक्त केला. तर बाजीराव पेशवे यांचे वीरतेला आपण विसरू शकत नाही. त्यांनी अनेक युद्ध जिंकले आणि गुजरातमध्येही मराठा साम्राज्य स्थापन केले. त्यांनी जंजिरा ला सिद्धी जौहरच्या ताब्यातून मुक्त केले. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे की, त्यांनी देशाला नेतृत्व दिले आहे. महाराष्ट्रातील वीर सावरकर, लोकमान्य टीळक यांनी देशाच्या स्वातंत्र लढयासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या शिवराज्याभिषेका सोहळ्याच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

इ.स.1617 मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्‍न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. जंजिरा, 20 सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी, म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाला.

बाजीराव पेशवे यांनी जंजिरा किल्ला जिंकला. त्याचा इतिहास विसरता येणार नाही, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांची मानसिकता ही पेशव्यांची असून कुलगुरूंच्या निवडीची यादी पाहिल्यास ते लक्षात येते. यापूर्वीचे राज्यपाल याबाबत जास्त बोलत होते. आताचे राज्यपाल कसे आहेत? हे स्पष्ट होऊ द्यावे लागेल, असा टोला शरद पवारांनी लगावला.