नागपूर अधिवेशन, तिसरा दिवस: विरोधकांच्या जोरदार घोषणाचा

नागपूर अधिवेशन, तिसरा दिवस: विरोधकांच्या जोरदार घोषणाचा
-दिल मांगे मोर, सत्ताधारी चोर
-नागपूरची संत्री भ्रष्टाचारी मंत्री

प्रतिनिधी
नागपूर : ‘दिल मांगे मोर, सत्ताधारी चोर’ नागपूरची संत्री भ्रष्टाचारी मंत्री, राजीनामा द्या राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या, अशा घोषणांनी विरोधकांनी विभानभवन परिसरात जोरदार घोषणा दिल्यात. हातात संत्री घेऊन जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवसही तीव्र आंदोलनाने दणाणून सोडला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात विरोधकांच्या आंदोलनाने सुरू झाली. शेतकरी उपाशी, मंत्री आहे तुपाशी, खोके येऊ द्या येऊ द्या, उद्योग जाऊ द्या-जाऊ द्यासह संत्री आहेत गोल, सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल, संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ, धानाला बोनस मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी विधानभवन परिसरात पाहायला मिळाल्यात.

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, रोहित पवार, सुनील केदार, विकास ठाकरे, किरण लहामटे, भास्कर जाधव व इतरांची उपस्थिती होती.