नव्या व्हायरसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे भाष्य
-केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती
प्रतिनिधी
मुंबई : व्हायरसने चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमीत तपासणीदरम्यान किमान दोन एचएमपीव्हीचे रूग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान या संसर्गासंबंधी केंद्र सरकारने काही महत्त्वाची माहिती दिली आहे.
-आरोग्य मंत्रालयाने म्हणते..
.भारतातील या व्हायरससंबंधी परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये एचएमपीव्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासूनच प्रसारित झाला आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. या संक्रमणावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही याची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. या दोनही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या व्हायरसमुळे घाबरु नका असं आवाहन केलं आहे.
व्हायरसला घाबरण्याचं कारण नाही. प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही, यापूर्वीही हा व्हायरस आला आहे. पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचूप्रवेश होताना दिसतो आहे. यासंदर्भात जी नियमावली आहे ती जाहीर होईल. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यांना माहिती देण्याचं ठरवलं आहे. या व्हायरसला घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. या संदर्भातल कपोलकल्पित माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल ती माहितीच द्यावी. आरोग्य विभागाची बैठक झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाबरोबर बैठक चालू आहे, असं सांगितलं आहे.


