दुसरा आठवडा: पहिला दिवस, विरोधकांकडून सत्ताधारी धारेवर
-‘ईडी सरकार हायहाय’च्या घोषणा
प्रतिनिधी
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिल्या दिवशी ही विरोधकांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदविला. ‘ईडी सरकारचा धिक्कार असो, राजीनामा द्या.. राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या, विदर्भातील संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे, धानाला बोनस मिळालाच पाहिजे, ईडी सरकार हायहाय’ या मागण्यांनी विरोधकांनी सभागृह परिसर दणाणून सोडला.
‘बोम्मई सरकार हायहाय, कर्नाटक सरकारचा निषेध असो, राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ’ अशा घोषणा देऊन अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवस विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, रोहित पवार, सुनील राऊत, भास्कर जाधव, विकास ठाकरे, हसन मुश्रीफ आदी सहभागी होते.


