आघाडीत बिघाडीचे वक्तव्य करू नका : दोन बड्या नेत्यांना दिल्लीला बोलाविणे
-काँग्रेसच्या न्यायपत्राचे काम युद्धपातळीवर
प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीतील जागावाटप व मुख्यमंत्रीपदावरून तीव्र झालेल्या वादात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रादेशिक नेत्यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी रात्री दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले असून विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व प्रभारी रमेश चन्निथाला यांनाही दिल्लीला चर्चेसाठी पाचारण केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अतिआत्मविश्वास आणि वादग्रस्त विधानांमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचा गैरसमज निर्माण होईल. नाहक वाद निर्माण करण्यापेक्षा जमिनीवर पाय ठेवून काम करा. उमेदवारांची निवड करताना अन्य जातींवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या, असा सल्ला खरगेंनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिल्याचे समजते. ‘महाविकास आघाडीसाठी अनुकूल परिस्थिती असली तरी आपलेच सरकार सत्तेत येणार, आता फक्त मुख्यमंत्री कोणाचा, हेच ठरायचे बाकी आहे असा समज घटक पक्षांतील नेत्यांनी करून घेतला आहे. नेत्यांमधील हा अतिआत्मविश्वास घात करू शकेल’, असे मत काँग्रेस कार्यकारिणीतील एका सदस्याने व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असून स्ट्राइक रेटही जास्त आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील जागावाटपामध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, असे विधान काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी केले होते. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी, ‘काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल’, असा दावा केला होता. या विधानांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीरपणे समर्थन केले होते. काँग्रेस नेत्यांच्या विधानांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण हे विधानसभा निवडणुकीत दिसेलच, असे ठणकावले. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेमुळे काँग्रेसला अधिक जागा मिळाल्याचा दावाही राऊत यांनी केला.
काँग्रेस नेते व शिवसेनेच्या ठाकरे गटातील वाद चिघळू लागल्याने काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने ‘मध्यस्थी’ केल्याचे समजते. राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने योग्य पावले टाकली असली तरी बदलापूर एन्काऊंटर आदी वादग्रस्त मुद्द्यांबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी मतप्रदर्शन करताना दक्षता घेतली पाहिजे, असे मत कार्यकारिणी सदस्याने व्यक्त केले.

-जाहीरनाम्याचे काम सुरू