अमरावती पदवीधर निवडणूक:२३‎ उमेदवारांचे भाग्याचा फैसला ४ फेब्रुवारीला

अमरावती पदवीधर निवडणूक:२३‎ उमेदवारांचे भाग्याचा फैसला ४ फेब्रुवारीला

-जिल्ह्यात सर्वाधिक कमी मतदान

अमन कठाणे
अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती‎ विभाग पदवीधर मतदारसंघासाठी‎ सोमवारी मतदान पार पडले. या‎ मतदानासोबतच सर्व २३‎ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद‎ झाले. निवडणूक ही पसंतीक्रमावर‎ आधारित असल्याने यामध्ये‎ ‘इव्हीएम’चा वापर करण्यात आला‎ नाही. मतमोजणी गुरुवारी, २‎ फेब्रुवारी रोजी नेमाणी इन येथे केली‎ जाईल. दरम्यान, पदवीधर मतदार‎ असूनही मतदानाचा टक्का‎ घसरल्याने सत्ताधारी भाजप तसेच‎ सर्वच उमेदवारांची धाकधूक‎ वाढली आहे.‎ दुपारी २ वाजेपर्यंत केवळ ३०.४०‎ टक्के मतदान झाले. उरलेल्या दोन‎ तासानंतर हा आकडा २० टक्क्यांनी‎ वाढून ४९.६७ वर स्थिरावला.‎

पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी अमरावती शहरातील‎ एका मतदान केंद्रात सुरू असलेली मतदानाची प्रक्रिया.‎ गेल्यावेळी झाले‎ ६३.५२% मतदान‎ सहा वर्षांपूर्वी २०१७ मध्ये‎ पार पडलेल्या‎ निवडणुकीत ६३.५२ टक्के‎ मतदारांनी मतदानाचा‎ हक्क बजावला होता.‎ त्यावेळी ९५ हजार ७९४‎ पुरुष व ३७ हजार ९२०‎ महिला मिळून १ लाख ३३‎ हजार ७१४ मतदारांनी‎ मतदान केले होते. २६८‎ टपाली मतपत्रिकांचा‎ वापरही त्यावेळी करण्यात‎ आला होता. ३४‎ दिव्यांगांनी इतरांचे सहाय्य‎ घेऊन मतदान केले होते.‎ आश्चर्यजनक बाब अशी‎ की तब्बल १० हजार १५४‎ मतपत्रिका अवैध ठरल्या‎ होत्या.‎

नोंदणी केली, पण मतदान कुठाय ?‎ सध्यस्थितीत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी‎ गृहराज्यमंत्री भाजपचे डॉ. रणजित पाटील करीत आहेत.‎ गेल्या दोन्ही निवडणुका सलग त्यांनीच जिंकल्या. यावेळीही‎ फार पूर्वीपासून तयारी सुरु करत त्यांच्या पक्षाने सर्वाधिक‎ मतदार नोंदणी केली. परंतु नोंदविलेल्या त्या मतदारांना थेट‎ मतदानाला पोहोचवण्यात मात्र त्यांना यश आले नाही. हीच‎ स्थिती इतर पक्ष-अपक्ष उमेदवारांचीही झाली आहे.