हे नेते का म्हणाले? अख्ख्या जगाला माहिती आहे, माझी जात
-ओबीसी दाखला व्हायरलवरून विधान
प्रतिनिधी
बारामती : गेल्या दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांचा ओबीसी दाखला व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या व्हायरल दाखल्यावर शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार यांनी तो दाखला खोटा असल्याचे सांगितले आहे. तर जगाला माहिती आहे माझी जात कोणती आहे असेही शरद पवार म्हणाले. ते असेही म्हणाले, ‘माझा दाखला मी बघितला. तो दाखला मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात होतो. तेव्हाचा तो दाखला आहे. तो दाखला खरा आहे. मात्र काही लोकांनी दुसरा इंग्रजीतील खोटा दाखला सोशल मीडियावर व्हायरल केला. त्या व्हायरल होणाऱ्या दाखल्यात माझ्या नावासमोर ओबीसी लिहिले आहे. मला ओबीसी समाजाचा आदर आहे. मात्र जन्माने जी प्रत्येकाची जात असते, ती मी लपवू इच्छित नाही. त्यामुळे संपूर्ण जगाला माहिती आहे की, माझी जात कोणती आहे.


