हे ठरले कारण: शरद पवार नितीन गडकरीच्या भेटीला
-वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी केली जागेची पाहणी
प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी भाजप नेते तथा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. उभयातांमध्ये बऱ्याच वेळा चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यावेळी शरद पवार यांच्यासोबत अनिल देशमुख देखील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. उद्या ते मध्य प्रदेशातील शिवनी येथे होणाऱ्या आदिवासी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी 100 एकर जागा घेण्यात आली आहे. आज शरद पवार यांनी नागपूर येथे वसंतदादा इंस्टिट्यूटच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर ते काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्या शेतावर गेले. त्यानंतर त्यांनी नितीन गडकरी यांच्या घरी भेट दिली. या भेटीत राज्यातील विविध विकास कामांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.


