हे आहे कारण, मागासवर्गीय आयोगाच्या सदस्याचे राजीनाम्याचे
-मराठा समाजाच्या सर्वेक्षणावरुन पहिली ठिणगी
प्रतिनिधी
मुंबई : राज्यात मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. विविध पातळ्यांवर त्यासाठी काम सुरू केले गेले आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचे काम सुरु झाले आहे. मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कामकाज सुरु झाले आहे. शुक्रवारी पुणे शहरात झालेल्या बैठकीत आयोगाने सर्वेक्षणाचे निकष निश्चित केले. हे निकष मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवले. त्यांना मंजुरी मिळल्यानंतर प्रत्यक्षात कामकाज सुरु होणार आहे. परंतु यासंदर्भात मागासवर्ग आयोगातील मतभेद उघड झाले आहे. सर्वेक्षणावरुन पहिली ठिणगी पडली आहे. आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी राजीनामा दिला आहे.


