शरद पवार गटाला मोठा दिलासा : या कारणासाठी मिळाली मोठी सूट
-निवडणूक आयोगाकडून मागणी मान्य
प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार पक्ष) केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या अनुच्छेद २९-ब व २९-क अंतर्गत देणग्या स्वीकारण्याची मुभा निवडणूक आयोगाने सोमवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली.
राज्यात पुढील तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून पक्षाला देणगी स्वीकारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची सोमवारी भेट घेतली. शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर देणग्यांचे धनादेश स्वीकारण्याची पक्षाची मागणी मान्य करण्यात आली.


