विकासाचा बुस्टर डोज : अख्ख मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये
-विकासासाठी निर्णय होणार
प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या विकासासाठी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक आज होत आहे. आमखास मैदानाजवळील स्मार्ट सिटी कार्यालयात या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्च मंत्री दाखल झाले आाहेत. मराठवाड्यात सात वर्षानंतर मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्या निमित्त सर्वच मंत्री शहरात आहेत. या बैठकीला सुरूवात झाली असून यात कोणते निर्णय घेतले जातात, त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मंत्रिमंडळाची बैठक आमखास मैदानाजवळील स्मार्ट सिटी कार्यालयात होत आहे. या बैठकीच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात या बैठकीला सुरूवात होणार आहे.
केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहे. ते राज्याच्या निधीमध्ये कोणतीही काटछाट करत नाही. सरकारचा संभाजीनगरच्या मुलभूत सोईसुविधांवर भर आहे. त्यामुळेच सरकारने येथील पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 2 हजार 784 कोटी रुपयांची महत्त्वकांक्षी योजना मंजूर केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मराठवाडा शैक्षणिक आणि मेडिकल हब बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे मत मुख्यंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
औरंगाबाद शहराचे नाव बदलल्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्याचेही नाव देखील छत्रपती संभाजीनगर जिल्हा करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवशी तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक असताना राज्य सरकारच्या वतीने राजपत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आता शहरानंतर जिल्ह्याचे नाव देखील बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. तर उस्मानाबाद शहरानंतर आता जिल्ह्याचेही नाव धाराशिव करण्यात आले आहे.


