रामटेक बंगला मिळाला : राजकीय भवितव्यचं पणाला
-बावनकुळे बंगला बदलण्याच्या तयारीत
प्रतिनिधी
मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर बंगल्याचे वाटप झाले आहे. या बंगले वाटपावरुन शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. कारण काही मंत्र्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिले गेले आहे. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीनंतर सर्वात ज्येष्ठ ठरलेले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे. परंतु रामटेक बंगल्याचा इतिहास पहिल्यास बावनकुळे बंगला बदलण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रामटेक बंगला ज्या मंत्र्यांना मिळाला, त्यांचे भवितव्य काय झाले? ही चर्चा आता सुरु झाली आहे.
-रामटेक बंगल्याचा थोडक्यात इतिहास
छगन भुजबळ : काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात भुजबळांना हा बंगला मिळाला होता. त्यावेळी तेलगी प्रकरण गाजले. स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ यांचे नाव आले. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
एकनाथ खडसे : युती सरकारच्या काळात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक बंगला मिळाला होता. पण त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.
पुन्हा छगन भुजबळ : २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्या सरकारमध्ये भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय मिळाले. पण भुजबळ मंत्री असलेले मविआ सरकार अडीच वर्षात कोसळले.
दीपक केसरकर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालेले असताना केसरकर यांना मात्र मंत्रिपद गमवावे लागले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा पत्ता कापण्यात आला.


