या शेतकरी नेत्याने मांडल्या : कार्यकर्त्यांच्या मनातील थेट भावना

या शेतकरी नेत्याने मांडल्या : कार्यकर्त्यांच्या मनातील थेट भावना

-राजानंद कावळे यांचा सवाल

प्रतिनिधी
नागपूर : जिल्ह्यातील ज्येष्ठ शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांनी एक थेट आणि विचार करायला लावणारा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलंय की, आजीवन पक्षासाठी, निवडणुकांमध्ये आणि नेत्यांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे जर नेतेच उभे राहत नसतील, तर मग कार्यकर्त्यांनी काय करावं ?.

या वक्तव्याने राजकीय नेत्यांना विचार करायला भाग पाडले आहे. अनेक कार्यकर्त्यांना ही भावना अगदी आपली वाटत असून त्यातून पक्षांतील अंतर्गत असंतोषही उघड होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कावळे यांचा सवाल केवळ एखाद्या पक्षापुरता मर्यादित नाही. सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांच्या व्यथा व्यक्त करणारा आहे. याशिवाय, त्यांनी शेतकरी कर्जमाफी व शेतकरी आत्महत्या व सरकारच्या भूमिकेवर जोरदार प्रहार केला. मराठीच्या मुद्ध्यावरून मराठी अस्मिता प्रथम महत्वाची आहे. यासाठी राजकीय मतभेद बाजूला सारून उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले. याचे स्वागतचं आहे.