या नेत्याचा आरोप: कृषीमंत्री सत्तार सर्वाधिक खोकेबाज

या नेत्याचा आरोप: कृषीमंत्री सत्तार सर्वाधिक खोकेबाज
-मात्र, कृषी विभागाकडे लक्ष नाही

प्रतिनिधी
औरंगाबाद : सर्वाधिक खोके अब्दुल सत्तार यांना मिळालेत. सत्तार गद्दारांचे महामेरू आहेत. ते बॅंकेत कशा पद्धतीने आले, कुणाच्या नावावर आले. ते बाहेर काढण्याची गरज आहे. त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज, बुधवारी दिला.

त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सर्वात मोठे खोके अब्दूल सत्तारांना मिळाले. खोके बॅंकेत कुणाच्या नावावर आले ते बाहेर काढण्याची गरज आहे.
अंबादास दानवे म्हणाले, स्वःतच्या घरातील लोक सीईटी घोटाळ्यात असताना उजळ माथ्याने हे मंत्री सर्वत्र बडबड करीत फिरत आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, स्वःतचे खाते, कृषी विभागाकडे लक्ष नाही. अपक्ष लढले आहेत. काॅंग्रेसकडे गेले, भाजपकडे घेत नव्हते म्हणून शिवसेना पक्षात गेले. आता हे गद्दारांकडे गेले. ते गद्दारांचा महामेरू आहे.

-ते हिंदुंना त्रास देतात
अब्दुल सत्तार महाराष्ट्रात बडबड करीत फिरत आहेत. मागच्यावेळी त्यांनी हनुमानाचा अनादर केला होता. कट्टर हिंदुत्वाची भाषा बोलतात पण ते हिंदुंना त्रास देतात. ते ज्या हिंदुंना सोबत घेऊन फिरले. त्यामुळे ते हिंदुत्ववादी होत नाहीत. त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.